सातारा : लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भालचंद्र लक्ष्मण साळुंखे रा. गोडोली, सातारा यांना विनाकारण लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच जनार्दन मोरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.