सातारा : खोपोली क्रीडा संकुल येथील क्रीडा संकुलात झालेल्या शालेय शासकीय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयातील राजवर्धन अजय भोगे या विद्यार्थ्यांने नेत्रदीपक यश संपादन केले.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावत आपली चमकदार कामगिरी दाखवली. मुलांच्या 17 वर्षे वयोगटात राजवर्धन भोगे याने 55 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला व गोल्ड मेडल मिळविले व त्याची उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याला प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, उपप्राचार्य एन. टी. निकम, पर्यवेक्षक व्ही. एम. वाळवेकर, पाटील मॅडम, जिमखाना विभागप्रमुख उदय शिंदे, क्रीडा शिक्षक अमोल जमदाडे, तुषार पोवार आणि इंद्रजीत मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.