कुसवडे तलावातील पाणी लवकरच शेतात खळाळणार

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश; बंदिस्त उजवा, डावा कालव्याच्या कामाचा शुभारंभ

by Team Satara Today | published on : 08 July 2025


सातारा : सातारा तालुक्यातील कुसवडे येथे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कुसवडे धरण बांधण्यात आले आहे. या तलावातील पाणी प्रत्यक्ष शेतीसाठी उपलब्ध व्हावे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून उजवा आणि डावा असे दोन बंदिस्त कालवे बांधण्यासाठी ७ कोटी ४४ लाख रुपये मंजूर झाले असून या दोन्ही कालव्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. यामुळे या तलावातील पाणी कुसवडे आणि भाटमरळी परिसरातील शेतात लवकरच खळाळणार आहे. 

कुसवडे येथील स्थानिक ओढ्यावर स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या दूरदृष्टीतून कुसवडे तलावाला १९९८- ९९ मध्ये मंजुरी मिळाली आणि अल्पावधीत या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. या धरणाची आवश्यक कामे मार्गी लावण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी २०२२-२३ मध्ये ३१ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केल्याने सर्व कामे पूर्ण झाली. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ३.४९ द.ल.घ.मी एवढी असून या धरणामुळे कुसवडे आणि भाटमरळी या दोन गावच्या परिसरातील ३५२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी बंदिस्त नलिकेद्वारे उजवा आणि डावा कालवा तयार करणे आवश्यक होते. या कामासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी ७ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करून घेतले. तसेच धरणावर जाण्यासाठीच्या काँक्रीट रस्त्यासाठीही त्यांनी १ कोटी २९ लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. या रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. 

दरम्यान, धरणापासून ३ किमी लांबीचा उजवा आणि ४ किमी लांबीचा डावा असे दोन बंदिस्त कालवे बांधण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीचे  विक्रम पवार, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेंद्र देशपांडे, तालुका खरेदी विक्री संघ व्हा. चेअरमन राजेंद्र यादव, अमर मोरे, सोमनाथ गोडसे, हिंदुराव जाधव, सरपंच योगेश गुरव, जयवंत यादव, प्रकाश निकम, नंदू मोरे, दत्तात्रय जगताप, रामचंद्र जगताप, समीर मुल्ला, जीवन जगताप, सचिन महाडिक, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश यादव, महेश यादव, प्रथमेश यादव, सागर चव्हाण, श्रीरंग पवार, कैलास गोडसे, समाधान चव्हाण,अरुण यादव, निलेश बल्लाळ,जयसिंग चव्हाण, विजय यादव आदी उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पुढील बातमी
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल तपास पथकाने केला सादर

संबंधित बातम्या