ढाका : बांगलादेशमध्ये विमान दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे प्रशिक्षण विमान सोमवारी दुपारी ढाका येथील उत्तर भागातील एका शाळेच्या परिसरात कोसळले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणि काहीजण जखमी झाले आहेत अशी माहिती लष्कर व अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
F-7 BGI हे विमान ढाकाच्या उतारा भागातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात दुपारी कोसळले आहे. शाळेत मुले उपस्थित असताना ही दुर्घटना घडली आहे. बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क कार्यालयाने एका संक्षिप्त निवेदनात पुष्टी केली की कोसळलेले F-7 BGI विमान हे हवाई दलाचे होते. अग्निशमन दलाते अधिकारी सांगितले की किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.