वृद्धेस मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

सातारा : वृद्धेस मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कमल प्रतापराव कदम रा. रविवार पेठ, सातारा यांच्या घरात बळजबरीने घुसून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी रघुनाथ भगवंतराव कदम, सागर रघुनाथ कदम, सोनाली सागर कदम, मंगल भगवंत कदम सर्व रा. नांदगाव, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.


मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
प्रतापसिंह नगरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

संबंधित बातम्या