विषारी औषध पिलेल्या रुग्णाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 21 April 2025


सातारा : विषारी औषध पिलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अपशिंगे (मिल्ट्रि, ता. सातारा) येथील अमोल सखाराम राठोड (वय 27) याने दि. 18 रोजी विषारी औषध पिल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बोरेगाव पोलीस ठाण्यात डॉ. प्रणाली भोसले यांनी माहिती दिली आहे. पोलीस नाईक म्हेत्रे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवड पोलिसांची थरारक कामगिरी
पुढील बातमी
चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या