फिरोजपूर : पंजाबमधील फिरोजपूर-फाजिलका महामार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. गोलुखा वळणाजवळ महिंद्रा पिकअप व्हॅन आणि केटरमध्ये धडक झाली . या धडकेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 15 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.हा अपघात शुक्रवारी, सकाळी ७:४५ च्या सुमारास हा अपघात झाला. महिंद्रा पिकअपमधून 15 हून अधिक वेटर जलालाबादकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूर फाजिल्का महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेले. त्यांना फाजिल्का येथील जलालाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. जखमी झालेल्या 15 जणांना फरीदकोट मेडिकल कॉलेज, फिरोजपूर हॉस्पिटल आणि जलालाबाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमधील लोक वेटर असल्याचे सांगितले जात होते आणि ते लग्न सोहळ्याला जात असताना अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज (31 जानेवारी) सकाळी फिरोजपूरमधील मोहन उत्तरजवळ हा अपघात झाला. घटनेच्या वेळी पिकअपमध्ये १५ हून अधिक लोक होते. गंभीर जखमींना रस्त्यावरून जाणाऱ्या आणि रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की पिकअप गाडीत बरेच लोक होते आणि गाडीही वेगाने जात होती. अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मोठा आवाज झाला आणि मग लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळाकडे धावले आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत आणि कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली. स्थानिक लोकांच्या मते, या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, परंतु वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कोणतेही बंधन नाही. मृतांच्या कुटुंबियांनी सरकारकडून भरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि जखमींवर उपचार करण्याचे आश्वासनही दिले आहे.
याप्रकरणी,डीएसपी सतनाम सिंह म्हणाले की, घटनेच्या १० मिनिटांतच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे फिरोजपूर, फरीदकोट, जलालाबाद आणि गुरुहरसहाई येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघात धुक्यामुळे झाला की इतर काही कारणामुळे झाला याचा तपास सुरू आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.