सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून, पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही आरोपीने तिला अनेकवेळा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित आरोपीविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक काटकर पुढील तपास करीत आहेत.