पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद चालला वाढत 

by Team Satara Today | published on : 11 September 2024


पाकिस्तान : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद वाढत चालला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने डूरंड लाइनजवळ नवीन सैन्य चौक्या स्थापन केल्या आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून तालिबान पाकिस्तानी सैन्याला चिथावणी देत आहे. मंगळवारी सकाळी तालिबानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात डांगम भागात पाकिस्तानी सीमेजवळ नवीन चौक्या निर्माण केल्या. पाकिस्तानी सैन्यावर दबाव टाकण्यासाठी या सैन्य चौक्यांची निर्मिती करण्यात आलीय. याआधी सुद्धा मागच्या काही दिवसात तालिबान आणि पाकिस्तानात सैन्यात झडपा झाल्या आहेत.

या तणावादरम्यान अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सीमा भागात पाकिस्तानी सैन्यासोबत हिंसक झडप झाली. यात दोन प्रमुख कमांडरसह आठ अफगाण तालिबानी मारले गेले. खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात 16 अफगाणि तालिबानी सैनिक जखमी झाले. डॉन वर्तमानपत्रानुसार, अफगाण तालिबानने 7 सप्टेंबरला सकाळी पाक-अफगाणिस्तान सीमेवर पालोसिन क्षेत्रात बऱ्याच मोठ्या शस्त्रसाठ्यासह पाकिस्तानी चेकपोस्टवर हल्ला केला.

दोन्ही बाजूचे लोक जखमी : 2021 मध्ये अनेकवेळा सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला आहे. यात दोन्ही बाजूचे लोक जखमी झालेत. रिपोर्ट्सनुसार, सीमेवर झालेल्या चकमकीत तालिबानचे 8 फायटर मारले गेले. 16 जखमी झाले. तालिबानचे दोन प्रमुख कमांडर खलील आणि जान मोहम्मद यांचा गोळीबारात मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सैन्याचा कमांडर मुहम्मद अली डूरंड लाइनवरील हिंसाचारात मारला गेला. 3 सैनिक जखमी झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हाडे लोखंडासारखी होतील मजबूत
पुढील बातमी
इंडिया-बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक

संबंधित बातम्या