सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व कामे अधिकाधिक दर्जेदार व्हावीत

ना. शिवेंद्रसिंहराजे; बिल्डर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 15 January 2025


सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यात विविध विकासकामे केली जातात. यामध्ये रस्त्यांसह विविध नागरी सुविधा, शासकीय, निमशासकीय इमारतींचे बांधकाम आदी कामांचा समावेश असतो. विभागामार्फत होणारी सर्व प्रकारची कामे अधिकाधिक दर्जेदार व्हावीत यासाठी सर्व अधिकारी आणि संबंधित सर्व घटकांनी जातीने लक्ष घालावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या. दरम्यान, बिल्डर्स असोसिएशनच्या मागण्या सोडवण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

मंत्रालयात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ना. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद गुप्ता, राष्टीय सचिव मोहिंदर रिजवानी, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, माजी राज्याध्यक्ष सचिन देशमुख, दत्ताजी मुळे, मंगेश जाधव, अजय गुजर, अभय चौक्शी, रमेश शिरसाट, प्रशांत सोंजे, सयाजी भोसले, अनुप शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीस बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस.एस. साळुंखे, एस. डी. देशपुते व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने नवीन दरपत्रक लागू करणे, थकीत बिले अदा करणे, मुदतवाढीच्या नियमांमध्ये सुधारणा करणे आदी मागण्या करण्यात आल्या. सर्व मागण्या सोडवण्याबाबत ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सकारात्मकता दर्शवली. दरम्यान, राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा सिंहाचा वाटा असतो, त्यामुळे या विभागामार्फत होणारी सर्व प्रकारची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व अधिकारी व कामाशी संबंधित सर्वांना केल्या.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे ‘इंदिरा भवन’ नवीन मुख्यालयाचे उद्घाटन
पुढील बातमी
राजधानी शाहूनगरीने पुन्हा एकदा अनुभवला शिवकाल

संबंधित बातम्या