नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेने (उबाठा) च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मविआचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैसे वाटप सुरू असल्याचा भाजपाचा आरोप आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या कार्यकर्त्याची गाडीही फोडली. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीही नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती.
दरम्यान, आजच्या घटनेवेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. नाशिकच्या पंचवटी परिसरात भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.
पालघर शहरातील विष्णूनगर परिसरातील वर्धमान गृहनिवासी संकुलामध्ये पैसे वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात राडा झाला. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील यांनी पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाने केला आहे. माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रवींद्र म्हात्रे यांची कार ताब्यात घेतली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी म्हात्रे यांची कार तक्रारदार यांच्यासमोर तपासली असून गाडीत पोलिसांना काहीही आढळले नाही.
छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाला. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गळणीम रोडवर सोनवणे यांची गाडी अडवत 10 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केली. यात सोनवणे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाळूज टोल नाक्याजवळील जवळील सीएसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |