सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्ह्यातील ९ नगरपालिका व एका नगरपंचायतींसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी (दि. १३) सकाळी १० ते २ या वेळेत राष्ट्रवादी भवन सातारा येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिका व १ नगरपंचायतसाठी नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी पक्षाकडे विहित नमुन्यात अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती गुरुवार राष्ट्रवादी भवन सातारा येथे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थित होणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन राजकुमार पाटील यांनी केले आहे.