अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 July 2025


सातारा : पेशंट म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टरवर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे असलेल्या फिजिओटेक क्लिनिकमधील डॉ. आदिश रमेश पाटील याने पेशंट म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून विनयभंग केला. फोटोबाबत कोणाला सांगितल्यास इंजक्शन देवून मारुन टाकण्याची धमकीही डॉक्टरने दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ही घटना 23 जून व 3 जुलै यावेळी घडली आहे. पिडीत तक्रारदार मुलगी अल्पवयीन असून ती थेरपी करण्यासाठी डॉ.आदिश पाटील याच्याकडे जात होती. पेशंटवर उपचार सुरु असताना मात्र डॉक्टरने पेशंट मुलीचे कंबरेचे, छातीचे उघड्या अवस्थेतील फोटो काढले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हायवे जाम करून रील बनवणार्‍या पाच युवकांवर गुन्हा
पुढील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या