सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन : जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 13 August 2025


सातारा : गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी गणेश चतुर्दशीच्या एक दिवस पूर्वी  mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील  यांनी केले आहे.            

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देतील. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत, संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करतील.

 निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे पुढच्या वर्षापासून शक्य
पुढील बातमी
'एफडीए'चा पुणेकरांच्या जीवाशी खेळ; फूड पॉयझनिंगच्या रुग्णांमध्ये वाढ

संबंधित बातम्या