जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा चित्रपट "संगीत मानापमान" चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील संगीताच्या मेजवानी ची एक छोटीशी झलक आपल्याला टिझर मध्ये बघायला मिळेल. अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोभनीय अंदाजात मोठ्या पद्यवार प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. आज दिवाळीच्या शुभदिनी निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि विशेष म्हणजे हा टिझर प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या मोस्ट अवेटेड मल्टी स्टारर चित्रपटा सोबत म्हणजेच "सिंघम अगेन" सोबत १ नोव्हेंबरला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी आणि सिंघमचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे सिनेमाघरांमध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी हा एंटरटेन्मेंट चा डबल डोस नक्कीच म्हणता येईल.
"संगीत मानापमान" या चित्रपटाच्या टिझरची सुरुवातच मधुर संगीताने होते. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. केवळ संगीत नव्हे तर पारंपरिक नृत्य, तलवारबाजी आणि मोठाले सेट, विलोभनीय दृष्य अशा बऱ्याच गोष्टी टिझर मध्ये आहेत, जे हे खात्री पटवून देतात कि नक्कीच हा चित्रपट नवीन वर्ष गाजवणार आहे.
या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना १६ दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे. इतकच नव्हे तर त्यातले ७ गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे अद्वितीय गायकांनी सजवलेली मैफिल आहे. अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी सोबतच या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि आणखी प्रसिद्ध कलाकार दिसणार आहे त्यामुळे नक्कीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
अभिनेते सुबोध भावे यांनी चित्रपटा विषयी आपलं मत व्यक्त करताना सांगितले की, "मला आनंद होतोय की आज रोहित शेट्टी दिग्दर्शित "सिंघम अगेन" सारख्या चित्रपटा सोबत मराठी परंपरेचा साज राखणारा आणि सुरेल संगीताचा मान ठेवणारा "संगीत मानापमान" चित्रपटाचा टिझर मोठ्या पद्यावर झळकणार आहे. केवळ मराठी माणूस नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे इतर तमाम प्रेक्षक आणि विशेषतः चित्रपटप्रेमी जे सिनेमागृहात जातील त्यांच्यासाठी नक्कीच मोठ्या पडद्यावर हा टिझर बघणं एक वेगळाच अनुभव असेल.
ज्योती देशपांडे यांची निर्मिती, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |

मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |