कूस बुद्रुक (बनघर) येथे एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा : सातारा तालुक्यातील कूस बुद्रुक (बनघर) येथे घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत कट्ट्यावर फोनवर बोलत असताना पवन मोहन लोटेकर (वय १९, रा. कुस बुद्रुक, पोस्ट बनघर) याला आयुष संदीप लोटेकर आणि ऋतिक उत्तम लोटेकर (दोघे रा. कुस बुद्रुक, बनघर) यांनी पाठीमागून येऊन चाकूसारख्या धारदार हत्याराने आणि लाकडी दांडक्याने शिवीगाळ करत मारहाण केली.अनिल लोटेकर यांच्या मुलीच्या गावदेव असताना तुला मस्ती आली होती का? तू गावदेव मध्ये ढकलाढकली केली त्यात तुझा पाय माझ्या पायावर पडला होता असा गैरसमज करून पवन याची मान खाली दाबून त्याच्या पाठीवर व छातीवर धारदार हत्याराने वार केले. एवढ्यावर न थांबता दोन्ही संशयित आरोपींनी हातातील लाकडी घाडगे डोक्यात मारून खून करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पवन लोटेकर यांनी तालुका पोलिसात दिली आहे. 

दोघांविरोधात कोणाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीएनएस कलमाप्रमाणे १०९(१),३५२,३५१(२)३५१(३)३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नेवसे करत आहेत. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट येथे झोपेत असलेल्या फिरस्त साडी विक्रेत्याच्या ८७ हजारांच्या साड्यांची चोरी
पुढील बातमी
घरासमोर गाडी पार्क केल्याच्या रागातून वनवासवाडी येथे गाडीची तोडफोड

संबंधित बातम्या