कोरेगाव : मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरून किन्हई येथील युवकाचे अपहरण करून त्याला लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केदार हरिचंद्र जाधव (वय २४, रा. किन्हई, ता. कोरेगाव) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्यानेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. ८ जून रोजी मध्यरात्री किन्हई गावच्या हद्दीतील पुलावर प्रसाद हणमंत सुतार, तन्मय हणमंत सुतार आणि जयकर टिवले (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. किन्हई) यांनी संगनमत करून केदार जाधव यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेले. श्रद्धाशी का बोलतो? या कारणावरून संशयितांनी केदार याला लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.