इस्रायली सैन्य हिज्बुल्लाहच्या तळावर हवाई हल्ले आणि हसन नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं आहे. इस्रायलने लेबनानच्या आत जमिनी हल्ले सुरु केले आहेत. दक्षिण लेबनानमध्ये हिज्बुल्लाहचे तळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात मर्यादीत आणि टार्गेटेड जमिनी हल्ले सुरु केले आहेत, असं इस्रायली सैन्याने सांगितलं. इस्रायली सैन्यानुसार, हे हल्ले अचूक गोपनीय माहितीच्या आधारावर केले जात आहेत.
लेबनानमध्ये इस्रायलने सुरु केलेल्या या ग्राऊंड ऑपरेशनवर अमेरिकेने सुद्धा भाष्य केलं आहे. IDF ने लेबनानमध्ये हिज्बुल्लाहच्या इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात कारवाई सुरु केली आहे. मर्यादीत स्वरुपाची ही Action असेल. इस्रायलने याची आम्हाला माहिती दिली आहे, असं अमेरिकेने सांगितलं. इस्रायली सीमेला लागून असलेल्या लेबनानच्या सीमा भागात हिज्बुल्लाहने जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलय त्यावर हल्ले सुरु आहेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ही माहिती दिली. याच इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करुन उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरु होते. म्हणून इस्रायलने आता हे तळ उखडून टाकण्याच ऑपरेशन सुरु केलं आहे. याआधी 2006 साली इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं होतं. 12 जुलै 2006 रोजी हिज्बुल्लाहने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सीमेमध्ये घुसून तीन सैनिकांची हत्या केली होती. दोघांना बंधक बनवलं होतं. 34 दिवस चाललेलं युद्ध इस्रायलने तत्कालीन पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांनी यासाठी लेबनानला जबाबदार ठरवत ‘एक्ट ऑफ वॉर’ म्हटलेलं. लेबनानला याची किंमत चुकवावी लागेल असं ते म्हणाले होते. त्याच रात्री इस्रायली सैन्याने लेबनावर हल्ला केला होता.
इस्रायली सैन्याने ग्राऊंड ऑपरेशनसह हवाई हल्ले केले होते. एका हवाई हल्ल्यात बेरुत इंटरनॅशनल एअरपोर्टचा रनवे सुद्धा नष्ट केला होता. 34 दिवस चाललेल्या इस्रायल-हिज्बुल्लाह युद्धात 1100 पेक्षा जास्त लेबनानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलच्या 165 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हिज्बुल्लाहची निम्मी सैन्य शक्ती संपली इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमध्ये घुसलं आहे. तिथे सीमेजवळ हिज्बुल्लाहने बांधलेल्या सुरुंगांमध्ये शोध मोहिम सुरु आहे. शुक्रवारी इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये हिज्बुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला. इस्रायलने हिज्बुल्लाहच कबंरड मोडताना त्यांची निम्मी सैन्य शक्ती संपवून टाकली आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |