लेबनानमध्ये हिजबुल्लाह फायटर्सना पेजर आणि वॉकी-टॉकी बॉम्बस्फोटात उडवण्याचा सिलसिला सुरु आहे. 100 पेक्षा अधिक फायटर्स जखमी झालेत. 90 जणांना उपचारासाठी इराणला पाठवण्यात आलय. अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर संशयाची सुई इस्रायलच खतरनाक सायबर वॉरफेयर युनिट 8200 वर आहे. लेबनानमध्ये हल्ले याच युनिटने घडवून आणल्याचा आरोप होतोय. इस्रायल यावर मौन बाळगून आहे. ही योजना बनवण्यासाठी एकवर्षापेक्षा जास्त वेळ लागला, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. यासाठी अचूक प्लानिंगची गरज होती. यात कथितरित्या युनिट 8200 च नाव घेतलं जातय. या हल्ल्यानंतर हिज्बुल्लाहची झोप उडालीय. इस्रायलच युनिट 8200 काय आहे? त्यांचं काम कसं चालतं? या बद्दल जाणून घ्या.
यूनिट 8200 हे इस्रायलयच सिक्रेट मिलिट्री युनिट आहे. ते इस्रायली डिफेंस फोर्सचा भाग आहे. हे इस्रायली सैन्याच सर्वात हायटेक युनिट आहे. कारण ते टेक्नोलॉजीने युद्ध लढतात. सायबर डिफेन्ससाठी काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. सर्वात एडवान्स लेव्हलची टेक्निक ते वापरतात. इस्रायलला सायबर हल्ल्यापासून वाचवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे. ते टेक्नोलॉजीच्या आधारे गोपनीय माहित मिळवतात.
युनिट 8200 च्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना अनेकदा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजेंसी (NSA) बरोबर होते. दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासह सायबर हल्ले करण्याची त्यांची क्षमता आहे. इस्रायलच्या या सीक्रेट युनिटचा भाग बनणं तितकं सोप नाहीय. यात टेक्नोलॉजीशी संबंधित इंटेलिजेंस एक्सपर्ट्सची भरती केली जाते.
हे युनिट वेगळ्या पद्धतीने विचार करतं. टेक्नोलॉजी स्पेशलिटी आणि काहीतरी नवीन करण्यावर फोकस करतं. यांच्या यूथ युनिटला हँकिंग, एन्क्रिप्शन आणि पाळत ठेवण्यासारखी कठीणात कठीण काम करण्याची ट्रेनिंग दिली जाते.
8200 युनिटचा कारभार इस्रायलच्या सीमेबाहेर पसरलेला आहे. अनेक हाय-प्रोफाईल सायबर ऑपरेशन्समध्ये या युनिटच नाव आलय. स्टक्सनेट वायरस हल्ला याच युनिटने घडवून आणल्याच बोललं जातं. स्टक्सनेट वायरस हल्ल्याने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच मोठं नुकसान केलं होतं. बरच मोठ यश मिळाल्यानंतरही यूनिट 8200 ला 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेला हल्ला रोखता आला नव्हता. त्यासाठी त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. या युनिटच्या कमांडरने जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |