जावयासह मुलीला दमदाटी तसेच शिवीगाळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 September 2026


सातारा : पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेलेल्या जावयाला सासरे, सासू व मेव्हण्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवार पेठेत घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. रोहित प्रकाश कांबळे (वय 35, रा. बेळगुंदी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली.
कांबळे यांची पत्नी सध्या शुक्रवार पेठेतील माहेरी राहत आहे. पत्नीला भेटण्यासाठी कांबळे तेथे गेले होते. त्यावेळी काही कारणावरून सासरे अमीन शेख, सासू व मेव्हणा सरफराज शेख यांनी कांबळे आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्यवसायासाठी 50 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या छळ प्रकरणी सहाजणांवर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा; एसटीची धडक, वृद्धाच्या पायांवरून बस

संबंधित बातम्या