सातारा : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या वतीने आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पुणे कडून साताराच्या दिशेने येणारी बेकायदेशीर देशी / विदेशी दारु व बिअरची वाहतूक पकडून दोघांना अटक करीत वाहनासह एकूण ७ लाख ८६ हजार ३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशाल दादासो राऊत व किरण दादासो राऊत, (दोघे रा.शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा) या दोन इसमांविरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याच्या सूचना विभागास देण्यात आल्या होत्या.त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या दोघांकडून देशी / विदेशी दारु व बिअरचे विविध ब्रँडचे एकूण २१ बॉक्स किंमत ८६,०३५/- तसेच टाटा कंपनीची चारचाकी अल्ट्रोज जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयात वाहनासह एकूण ७,८६,०३५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक श्री. माधव चव्हाण, करीत आहेत.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागु झाले पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य, निर्मिती, वाहतूक व विक्री बाबतचे एकुण ५७ गुन्हे दाखल केले आहे. त्यामध्ये ६४ आरोपीना अटक करून त्यांचे ताब्यातुन १० वाहनांसह एकुण २२ लाख ५९ हजार ७४५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये बेकायदा हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची बेकायदेशीर निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक श्री. रविंद्र आवळे यांनी केले आहे.
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
by Team Satara Today | published on : 05 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026
दीडशे वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडला ना ?
January 15, 2026
सातारा शहरातील पंताचा गोट परिसरातील तरुण बेपत्ता
January 14, 2026
सातारा शहरात जुगार खेळत असताना पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा
January 14, 2026
फ्लॅट व दुचाकीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा
January 14, 2026