सातारा : जागेच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गजवडी तालुका सातारा येथील शिवाजी विठोबा कदम यांना जागेच्या कारणावरून तेथीलच रवींद्र लालासो कदम, संजय नवनाथ कदम, नर्मदा लालासो कदम यांनी स्टीलच्या राॅडने मारहाण केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तर रवींद्र लालासो कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत शिवाजी विठोबा कदम, अभिजीत शिवाजी कदम दोन्ही रा. गजवडी, ता. सातारा यांनी त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे.