सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा परिसरात चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून समीर आबाजी कांबळे (वय 42, रा. गेंडामाळ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम, सीपीयू, मॉनिटर, किबोर्ड असा एकूण 4 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.