सातारा : खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे लोणंद ते फलटण जाणार्या रस्त्यावर सॅन्ट्रो कार आणि टेम्पोचा अपघात दि. 8 जानेवारी रोजी झाला होता. त्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून त्या अपघात प्रकरणी कार चालकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक संतोष मरळ रा. केळवडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन सँट्रो कार चालक विकी अमोल शिंदे वय 25, रा. तरडगाव याने समोरुन सुपर कॅरी टेम्पोला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच कार चालक विकी शिंदे याचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी काजल विकी शिंदे वय 22 हि जखमी झाली. तसेच टेम्पो चालक संतोष मरळ हाही जखमी झाला. यावरुन दि. 3 फेब्रुवारी रोजी लोणंद पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.