मृदा तपासणीतून सातारा जिल्ह्यातील 467 गावांचा जमीन सुपिकता निर्देशांक तयार

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा  : शेतकऱ्यांच्या जमिनीचे आरोग्य जपून उत्पादन क्षमता वाढविण्याच्या उददेशाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा भाग्यश्री फरांदे यांचे मार्गदर्शनाखाली यांचे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, सातारा कार्यालयामार्फत राष्ट्रिय कृषी विकास योजना जमीन आरोग्य व सुपिकता निर्देशांक कार्यक्रम अंतर्गत व इतर संलग्न योजनांमधून मागील तीन वर्ष सन २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या साधारणतः ५५ हजार मृद नमुने तपासणीच्या आधारे एकूण ४६७ गावांचा गावनिहाय जमिन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आला आहे.

या निर्देशांकामध्ये सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्धता, जमिनीचा सामू व क्षारता यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले असून गावनिहाय जमिनीच्या सुपिकतेचे वास्तव चिञ समोर आले आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन करणे सोयाचे होणार आहे. तसेच जमीन सुपिकता निर्देशांकामुळे अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कमी होउन उत्पादन खर्चात बचत, जमिनीचे आरोग्य सुधारणे, पीक उत्पादन व गुणवत्ता वाढ तसेच पर्यावरण पूरक शेतीला चालना मिळणर आहे. कृषी विभागाच्या विविध योजना, पोषण द्रव्ये व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीसाठी हा जमीन सुपिकता निर्देशांक महत्वाचा ठरणार आहे.

या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या जमीन सुपिकता निर्देशांकाची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळणार आहे. तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, सातारा, संबंधित तालुक्याचे मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व संबंधित गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ पुनरिक्षण कामाला सुरुवात करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
परळी परिसरात बिबट्याने शेळ्या फस्त करत, वन कार्यालयाच्या आवारात कुत्र्याचाही फडशा पाडला; परिसरात एकच खळबळ

संबंधित बातम्या