पोर्श अपघात प्रकरणी विशाल-शिवानी अग्रवाल यांच्यासह 6 आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

by Team Satara Today | published on : 23 August 2024


पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कारन चालवता बाईकला धडक दिली, त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आता जवळपास चार महिने उलटून गेले असून अपघातास जबाबदार ठरलेला अल्पवयीन आरोपी हा बाल न्यायालयाने जामीन दिल्याने सध्या बाहेर आहे. मात्र त्याचे आई-वडील, शिवानी आणि विशाल अग्रवाल हे सध्या तुरूंगात आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळला. विशाल-शिवानी अग्रवाल यांच्यासह डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर, यासह २ आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र या 6 आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

19 मे रोजी मध्यरात्री अल्पवयी मुलाने पबमध्ये जाऊन पार्टी केली, मद्यप्राशनही केले. त्यानंतर त्याने दारूच्या नशेतच पोर्श कार भरधाव वेगाने चालवली आणि एका बाईकला जोरदार धडक दिली. यामध्ये इंजिनिअर तरूण-तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघाताची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घे, असा दबाव त्या दोघांनी त्यांच्या ड्रायव्हरवर टाकल, त्यासाठी त्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले असा आरोपही त्यांच्यावर आहे. एवढंच नव्हे तर जबाब बदलण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडून ड्रायव्हरवर दबाब आणण्यात आला. यापूर्वी पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली. सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी बोलावलं होतं.त्यानंतर अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. मात्र त्याचे आई-वडील अद्याप तुरूंगातच आहेत.

पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता, असा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. त्याच्या रक्ताचेही नमुने बदलण्यात आले होते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात अनेक खुलासे झालेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात फारशा सक्रिय नाही दिसत
पुढील बातमी
भारत आणि युक्रेनमध्ये डिफेन्स टेक्नोलॉजी आणि शस्त्रास्त्रांचा होते आदान-प्रदान

संबंधित बातम्या