कराड : उसाच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्यांच्या पिलांना त्यांच्या आईने अवघ्या काही तासांत स्वगृही परत नेले. नांदगाव येथे झालेल्या आई व बछड्यांचा प्रसंग वन विभागाच्या कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. काही तासांच्या फरकात बिबट्याच्या बछड्यांना त्यांच्या आईने परत त्यांना त्यांच्या अधिवासात नेल्याने वन विभागाची मोहीमही फत्ते झाली.
नांदगाव येथे उसाच्या शेतात बिबट्या व त्याच्या बछड्यांचे वास्तव्य होते. त्या शेतात ऊसतोड आली होती. ती सुरू असताना त्या शेतात बिबट्याच्या दोन बछडी आढळली. त्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित वन विभागास दिली.
त्यानुसार ती दोन्ही बछडे वन विभागाने ताब्यात घेतले. त्याची माहिती साताऱ्याच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षण महेश झांजुर्णे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार त्या बछड्यांची पुन्हा त्यांच्या आईशी भेट घडवून देण्यात आली.
येथील वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल आनंदा जगताप, वनरक्षक अभिजित शेळके, कैलास सानप, अक्षय पाटील व वाईल्डहार्ट रेस्क्यूअर नाइट्स सदस्य अजय महाडिक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, सचिन मोहिते यांनी त्या दृष्टीने.
काल दुपारनंतर त्या बिबट्याच्या बछड्यांना त्याच नैसर्गिक अवस्थेत एका कॅरेटमध्ये शेतात ठेवले. काल रात्रीच आठच्या सुमारास त्या बछड्यांची आई तेथे आली. त्या बछड्यांना नेण्यासाठी आलेल्या आईने अवघ्या तासाभरात दोन्ही बछड्यांना घेऊन गेली.