जिल्ह्यातील आठही मदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी नावे तपासून घ्यावीत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

by Team Satara Today | published on : 30 August 2024


सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राबविण्यात आला होता. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 29 ऑगस्टपर्यंत नवीन नोंदणी हरकती तसेच फॉर्म दुरुस्ती करुन मतदार यादी तयार करण्यात आली आहे. तरी मतदारांनी आपली नावे तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
255- फलटण तालुक्यात 1 लाख 73 हजार 67 पुरुष मतदार, 1 लाख 65 हजार 925 स्त्री मतदार, तर तृतीयपंथी 14 असे एकूण 3 लाख 39 हजार 6 मतदार आहेत. 256- वाई तालुक्यात 1 लाख 73 हजार 168 पुरुष मतदार, 1 लाख 72 हजार 122 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 7 असे एकूण 3 लाख 45 हजार 297 मतदार आहेत. 257- कोरेगाव तालुक्यात 1 लाख 61 हजार 50 पुरुष मतदार, 1 लाख 55 हजार 830 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 3 असे एकूण 3 लाख 16 हजार 883 मतदार आहेत. 258- माण तालुक्यात 1 लाख 82 हजार 250 पुरुष मतदार, 1 लाख 73 हजार 162 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 10 असे एकूण 3 लाख 55 हजार 422 मतदार आहेत.
259- कराड उत्तर तालुक्यात 1 लाख 54 हजार 56 पुरुष मतदार, 1 लाख 48 हजार 823 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 7 असे एकूण 3 लाख 2 हजार 886 मतदार आहेत. 260- कराड दक्षिण तालुक्यात 1 लाख 58 हजार 300 पुरुष मतदार, 1 लाख 52 हजार 720 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 30 असे एकूण 3 लाख 11 हजार 50 मतदार आहेत. 261- पाटण तालुक्यात 1 लाख 55 हजार 308 पुरुष मतदार, 1 लाख 51 हजार 96 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 3 असे एकूण 3 लाख 6 हजार 407 मतदार आहेत. 262- सातारा तालुक्यात 1 लाख 70 हजार 982 पुरुष मतदार, 1 लाख 9 हजार 777 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 35 असे एकूण 3 लाख 40 हजार 794 मतदार आहेत. असे एकूण जिल्ह्यात 26 लाख 17 हजार 745 मतदार आहेत.
मतदार यादीचा डाटा व छापील मतदार यादी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे. तसेच ीरींरीर.पळल.ळप या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय व जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर देखील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिंड्यांना निधी उपलब्ध नसल्याचे कारण राजकीय नसून प्रशासकीय : अक्षयमहाराज
पुढील बातमी
छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच पुतळा सातारा जिल्ह्यात उभारण्याची परवानगी मिळावी

संबंधित बातम्या