वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात थापल्या चुलीवर भाकऱ्या; जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाईचे निषेध आंदोलन

by Team Satara Today | published on : 07 April 2026


सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाईचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून चक्क भाकऱ्या थापल्या. या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.

सातारा येथील राज्यभरातिल गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या घोषणांनी लक्ष वेधून घेण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत चूल पेटवून कार्यकर्त्यांनी चक्क भाकऱ्या थापल्या. 

या आंदोलनाबाबत बोलताना कांबळे म्हणाले,  गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे छोटे व्यावसायिक हॉटेल्स तसेच विद्यार्थ्यांच्या जीवन व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे अकोला व अमरावती येथे गॅस साठी रांगेत उभे राहणाऱ्यांची मृत्यू झाले आहेत गॅसची कृत्रिम टंचाई थांबवणे काळाबाजार रोखणे सिलेंडर वितरणाची अट शिथिल करणे कम्युनिटी किचन सुरू करणे इत्यादी मागण्या प्रशासनाने करण्यात आले आहेत याबाबत शासनाने तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुरघोड्या बंद करा शहराच्या विकासावर लक्ष द्या - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरसेवकांना कानपिचक्या
पुढील बातमी
कर्तृत्ववान महिलांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक - ना. शिवेंद्रसिंहराजे; महिला सन्मान सोहळा, आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

संबंधित बातम्या