कोंडवे येथे सेवा संकल्प अभियान व लोकसंवाद कार्यक्रमास प्रतिसाद; महिला सक्षमीकरण केंद्र आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती

by Team Satara Today | published on : 22 September 2026


सातारा : महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा, अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड लाइन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेवा संकल्प अभियान व लोकसंवाद विशेष जनजागृती कोंडवे येथील एकदंत गणेश उत्सव मंडळात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हिंसाचाराने पीडित महिलांना केंद्रातर्फे पुरविल्या जाणाऱ्या मोफत सुविधा जसे की समुपदेशन, वैद्यकीय सेवा, तात्काळ पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन आणि तात्पुरत्या निवासाची सोय याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या महत्त्वाच्या हेल्पलाइन नंबरबाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले. यामध्ये महिला हेल्पलाइन १८१, चाइल्ड हेल्पलाइन १०९८, आपत्कालीन पोलीस हेल्पलाइन ११२ आणि सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० या टोल-फ्री क्रमांकांची माहिती देण्यात आली.
या जनजागृती अभियानात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा कायदा (POCSO Act), अनाथ प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आणि बालविवाह प्रतिबंध कायदा यांसारख्या विविध कल्याणकारी व कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. याशिवाय महिला सुरक्षेसाठी उपयुक्त असलेल्या 'मिशन शक्ती' मोबाईल ॲपची माहिती देऊन उपस्थितांना ते डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक आणि महिलांची मोठी उपस्थिती लाभली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे
पुढील बातमी
रहिमतपूर परिसरात तुटलेल्‍या वीजवाहिनीच्‍या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू; घटनेनंतर नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात संतापाचे वातावरण

संबंधित बातम्या