गणना न झालेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध; सातारा जिल्हयातील सर्व मतदारांनी यादीची पडताळणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा  : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम - 2026 च्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील एकूण 8 मतदार संघामधील गैरहजर, मयत, स्थलांतरीत, दुबार (ASDD) या कारणास्तव प्राप्त न झालेल्या गणना प्रपत्र (Uncollectable EFs) मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे https://www.satara.gov.in/notice/sir-2026-asddabsent-permanantly-shifted-dead-duplicate-list/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे. तसेच मतदार नोंदणी कार्यालय, तालुका स्तरावर व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे कडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

सातारा जिल्हयातील सर्व मतदारांनी सदरच्या यादीची पडताळणी करून घ्यावी. नजरचुकीने आपले नाव सदरच्या यादी मध्ये आले असल्यास दिनांक. 17 ऑगस्ट, 2026 पूर्वी आपले यादी भागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे संपर्क साधून आवश्यक ती सुधारणा करून घेण्यात यावी. सातारा जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये “ कोणताही पात्र उमेदवार वंचित राहणार नाही, कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही  याची काळजी सर्वांनी मिळून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; जमिनीवर नावे लावण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
पॉश ॲक्टची अंमलबजावणी करण्याचे महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे आवाहन; अंमलबजावणी न करणा-या कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा

संबंधित बातम्या