संगमनगर परिसरातील घरफोडीत 56 हजारांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 11 July 2026


सातारा : शहरातील संगमनगर परिसरातील गोकर्ण कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी एका घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण 56 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

याप्रकरणी लिलावती मारुती सपकाळ (रा. गोकर्ण कॉलनी, संगमनगर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी सावंत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोक्सो प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
राधिका चौकात दोन वाहनांची जोरदार धडक, दोघे जखमी

संबंधित बातम्या