छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 13 February 2026


सातारा :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी रोजी मेगा पदयात्रेचा मुख्य कार्यक्रम सातारा येथे होणार आहे. विविध विभागांनी समन्वय साधून हा मुख्य कार्यक्रम यशस्वी करावा, तसेच या पदयात्रेत सातारा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मेगा पदयात्रा आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, नगर परिषद प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

19 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा आराखडा तयार करावा, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री.  पाटील म्हणाले, शिवजयंतीचा प्रमुख कार्यक्रम मेगा पदयात्रा भव्य दिव्य करण्यात येणार असून जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होण्यासाठी तातडीने प्राचार्याची बैठक घ्यावी. 


तसेच या पदयात्रेत खेळाडू, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थ, सहभाग घ्यावा.

पदयात्रा मार्गाची नगर पालिकेन सजावट करावी,  तसेच मार्गावरील खड्डे बुजवावेत. पदयात्रेत शिवकालीन पोशाख घालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करावा. शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरण करणारी पथनाट्ये, चित्ररथ, लेझीम पथके , मर्दानी खेळ  सादर करणारी पथके जागो जागी ठेवावे. शिवतिर्थावर शिवकालीन इतिहासाचा दैदीप्यमान वारसा सांगणारा  पोवाडा कार्यक्रम आयोजित करावा. पदयात्रा मार्गावर   रांगोळ्या काढाव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह रुग्णवाहिका तैनात ठेवावी. तसेच या पदयात्रेला शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीही उपस्थित रहावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल; अंथरुणावरच्या रुग्णांना दिलासा पॅलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ; अंमलबजावणीसाठी जिल्हा पॅलिएटिव्ह केअर समितीची स्थापन
पुढील बातमी
खारघर येथे होणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था - जिल्हाधिकारी संतोष पाटील; नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

संबंधित बातम्या