पोक्सोसह मारहाण, जबरी चोरी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 08 April 2025


सातारा : पोक्सोसह मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात  परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चैतन्य माने, विशाल माने दोघेही रा. देगाव ता. सातारा, रोहित कांबळे रा. समर्थ मंदिर सातारा, प्रथमेश तावरे रा. रायगाव ता. जावली जि. सातारा, श्रीहरी कळसकर रा. गुरुवार पेठ सातारा हे पाचजण चार चाकी गाडी क्र. एमएच 11 एडब्ल्यू 4988 मधून कोडोली येथील गणेश चौकात असणाऱ्या वृंदावन हॉटेल येथे आले. तेथे त्यांनी हर्षद प्रभाकर नलवडे रा. देगाव, ता. सातारा यांना मारहाण करून चैतन्य माने यांनी त्याच्या जवळील काळ्या रंगाची पिस्टल सारखे दिसणारी एअरगन काढून नलावडे यांना गोळी घालतो, असे म्हणून मारहाण केली. दरम्यान भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या हॉटेलचे मालक अर्जुन भगत, धनाजी भगत, अतुल भगत यांना देखील मारहाण करून हॉटेलमधील गल्ल्यातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन गेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.

तर दुसऱ्या तक्रारीत, एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी हर्षद प्रभाकर नलवडे, अतुल धनाजी भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वृद्धाची सुमारे पाऊण लाखाची फसवणूक
पुढील बातमी
बालकांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी सरकारचा पुढाकार

संबंधित बातम्या