जिल्ह्यातील चार पोलीस उप अधीक्षकांच्या बदल्या

आठ एपीआय अधिकारी पदोन्नतीने होणार पीआय

by Team Satara Today | published on : 31 July 2025


सातारा : जिल्ह्यातील चार पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कराड, फलटण, दहिवडी, सातारा ग्रामीण येथील अधिकार्‍यांचा समावेश आहे. याचबरोबर जिल्ह्यातील आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकार्‍यांना पदोन्नती मिळून त्यांचा पोलीस निरीक्षक बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

डीवाएसपी राजश्री पाटील सांगली तुरची प्रशिक्षण केंद्र येथून कराड येथे बदली झाली आहे. डीवायएसपी विशाल खांबे यांची जालना येथून फलटण येथे बदली झाली आहे.

कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांची ठाणे शहर येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. सातारा ग्रामीणच्या सोनाली कदम यांची तुरची सांगली प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे. दहिवडीच्या डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांची गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे बदली झाली आहे. फलटणचे डीवायएसपी राहूल धस यांनी नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दलात सध्या सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) दर्जाचे आठ जणांना पदोन्नती मिळून ते पोलीस निरीक्षक होणार आहेत. याबाबतची माहिती गृह विभागाने मागवली असून पुढील आठवड्यात प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

आठ पोलीस अधिकार्‍यांमध्ये भुईंज पोलीस ठाण्याचे रमेश गर्जे, सातारा शहर पोलीस ठाण्यातील शामराव काळे, पोलीस अधीक्षकांचे वाचक रविंद्र तेलतुंबडे, तळबीडचे किरण भोसले, आर्थिक गुन्हेचे राजेंद्र चौधरी, अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक ज्ञानेश्वर धनवे, औंधचे अविनाश मते, नितीन नम या पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. राज्यातील 361 सहायक पोलीस निरीक्षकांना बढती मिळून ते पोलीस निरीक्षक होणार आहेत. सध्या सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्यांमध्ये 8 जणांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची राज्यभरात बदली होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉक्टर स्वाती गरगटे यांचे निधन
पुढील बातमी
जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना मारहाण

संबंधित बातम्या