हिंदी शिक्षक महामंडळाच्या राज्यस्तर निबंध स्पर्धेत भिलारच्या बगाडे व पेठच्या शेवाळे प्रथम

by Team Satara Today | published on : 10 December 2025


पुसेगाव : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाच्यावतीने राज्यस्तयिय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करणेत आला.या स्पर्धेत हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलारच्या (सातारा) विनायक बगाडे व दयानंद अकॅडमी, पेठच्या (सांगली) प्रतिभा शेवाळे यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत राज्याच्या विविध जिल्ह्यातील २३ शिक्षक सहभागी झाले होते. स्पर्धेतील अन्य क्रमांकाचे मानकरी याप्रमाणे : द्वितीय क्रमांक : शिवाजी जाधव, (सेंट झेविअर्स विद्यालय,पाचगणी) व सौ. मंदाकिनी शेवाळे (वि.स.पागे कृषी विद्यालय,तासगाव सांगली) यांना संयुक्तपणे देण्यातत आला. तृतीय क्रमांक सुहास गेल्ये, दादासाहेब सरफरे (विद्यालय, बुरंबीर त्नागिरी) व उदयकुमार गवळी, (श्री.यशवंत माध्यमिक विद्यालय,कोकरूड) यांनी मिळविला तर चौथा व पाचवा क्रमांक क्रमश: रवींद्र बागडी,(श्री पाराशर विद्यालय,पारगाव, कोल्हापूर) व कविता शर्मा, (ह.मो.पारेख हायस्कूल,म्हसोली,पालघर) यांना देण्यात आला.

स्पर्धेचे संयोजक म्हणून सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष नेताजी ननावरे यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ.शोभा पाटील, शाहनवाज मुजावर व सुधाकर माने यांनी काम पहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉक्टरांशिवाय तपासण्या करणार्‍या लॅबचा पर्दाफाश; कराडमधील प्रकार; मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या 17 जणांवर गुन्हा
पुढील बातमी
वाळूच्या ई लिलावाची प्राथमिक फेरी सुरू; प्राधिकरणाच्या अटींनुसार ही प्रक्रिया राबवणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

संबंधित बातम्या