सातारा : पानमळेवाडी ता.सातारा येथे दोन गटात मारहाण झाल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिध्देश रविंद्र भोसले (वय 22, रा. पानमळेवाडी) या युवकाने अजय मिठारे, किरण मिठारे, विक्रम मिठारे, निलेश सकट, काशिनाथ पाचांगे, यश पाचांगे, विश्वनाथ पाचांगे, सागर लोहार यांच्या विरुध्द मारहाणीची तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
दुसरी तक्रार महिलेने विनयभंगासह मारहाणीची दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सुमीत भोसले, प्रज्वल भोसले, शिवराज जाधव, मधुकर भोसले, रवी भोसले, सिध्देश भोसले यांच्यासह एका महिलेविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 16 ऑगस्ट रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.