सातारा : सातारा केसरकर पेठ येथील हरिजन सोसायटीची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळून मेहेर सोसायटीच्या आवारातील तीन वाहनांचे नुकसान झाले रात्री साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित नागरिकांनी मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. शाहू चौक ते चार भिंती या रस्त्यादरम्यान डोंगर उतारावर हरिजन गिरीजन सोसायटी आहे. या सोसायटीच्या खालच्या बाजूला मेहेर देशमुख सोसायटी असून येथे तीव्र उतार आहे, रात्री साडेबाराच्या दरम्यान पावसाचा जोर वाढल्यामुळे हरिजन गिरीजन सोसायटीच्या संरक्षक भिंतीचा मोठा भाग अचानक पणे कोसळून मेहेर सोसायटी मधल्या काही नागरिकांच्या घरासमोर कोसळला सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र घरासमोरील एक रिक्षा एक दुचाकी यांचे मात्र मोठे नुकसान झाले. या सोसायटीला तीव्र उतारा असून येथे काही ठिकाणी भराव खचलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हरिजन गिरीजन सोसायटीच्या एका भागामध्ये सिमेंटची पोती ठेवण्यासाठी मोठी खोली बांधण्यात आली होती. या नदीकृत बांधकामामुळेच संरक्षक भिंतीवर ताण घेऊन ती कोसळल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पालिकेने यापूर्वीच धोकादायक ठिकाणांना नोटीसा बजावलेले आहेत. मात्र मुसळधार पाऊस जमिनीचा तीव्र उतार आणि भिंत कोसळल्यामुळे भीतीचे वातावरण यामुळे दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी याबाबत तातडीने संबंधित इमारतीच्या रहिवाशांनी संरक्षक भिंतीचे बांधकाम करून घ्यावे अशा सूचना केल्या आहेत.