सातारा : राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, संसदीय अधिवेशनात झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत, भारतीय जनता पार्टी व निवडणूक आयोगाने मिळून मतदार यादीतील बनावट मतदार यादी तयार करून, मतदान चोरी केले आहे, यामुळे भाजपचे जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आले आहे, याविषयी खासदार राहुल गांधी यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनात, आपले मुद्दे मांडले. तसेच भाजप विरुद्ध हल्लाबोल केला, याविषयी संपूर्ण देशात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना समर्थन देत आंदोलन केले. निवडणूक आयोग चोर, अशा घोषणा देत आंदोलन केले. त्यामुळे राहुल गांधी यांना आज अटक केली. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी कडून, जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बाहेर जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रास्ता रोको केला.
यावेळी राहुल गांधी यांना अटक केल्याचा निषेध व्यक्त करत, खर्या अर्थाने लोकशाहीची हत्या झाली आहे, असे मत देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भाजपवर टीका केली.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सातारा शहरात रास्ता रोको
जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी राहुल गांधी यांच्या अटकेचा केला निषेध
by Team Satara Today | published on : 11 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा