सातारा : जुन्या वादाच्या कारणावरून भाजी मंडईतील दुकानासमोर दोघांनी तरुणाला शिवीगाळ करून भाजीच्या कॅरेटने डोक्यात व तोंडावर मारहाण केल्याची घटना दि. 27 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास देगाव फाटा येथे घडली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नी व बहिणीलाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत यशवंत चव्हाण (वय 47, रा. निशिगंधा कॉलनी, देगाव फाटा, सातारा) हे कृष्णा फाट्याशेजारील भाजी मंडईच्या दुकानासमोर असताना संकेत जाधव हा एमएच-11-बीएच-7999 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून तेथे आला. जुन्या वादाच्या कारणावरून त्याने चव्हाण यांना शिवीगाळ करून भाजीपाल्याच्या कॅरेटने त्यांच्या डोक्यात व तोंडावर मारहाण केली.
संकेत जाधव हा मारहाण करीत असताना प्रथमेश माने हा पांढर्या रंगाच्या ऍक्सेस मोपेडवरून तेथे आला. त्याने का त्रास देतो?’ असे म्हणत तेथील भाजीचे कॅरेट उचलून फिर्यादी व त्यांचे मेहुणे सतीश गुलाब जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, फिर्यादीची पत्नी सविता व बहीण सरिता या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता संकेत जाधव याने त्यांच्याशी धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी हनुमंत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत जाधव व प्रथमेश माने (रा. गोडोली, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
जुन्या वादातून एकास मारहाण; दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा