नगराध्यक्ष अमोल मोहिते आज पदभार स्वीकारणार; दोन्ही राजे राहणार उपस्थित, उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

by Team Satara Today | published on : 25 December 2025


सातारा  : सातारा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते हे उद्या गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.या पदभार स्वीकृती सोहळ्यास माननीय खासदार उदयनराजे भोसले तसेच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हा कार्यक्रम उद्या दुपारी ४ वाजता, सातारा नगरपालिका कार्यालय, केसरकर पेठ, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तसेच सातारा शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले आहे.ही माहिती भाजप सातारा जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख विकास विजय गोसावी यांनी दिली आहे.

27 डिसेंबर 2025 रोजी प्रशासकीय कारकीर्दीची बरोबर चार वर्षे पूर्ण होत आहेत त्याच्या आदल्या दिवशीच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदभार स्वीकारत आहेत. पुढील चार दिवसांमध्ये सर्वसाधारण सभा बोलावली जाणारा असून या सभेमध्ये उपनगराध्यक्ष निवड व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली जाण्याची शक्यता आहे .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपक्ष नगरसेवक सागर पावशे यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; उदयनराजे यांनी पावशे यांना भरविला पेढा
पुढील बातमी
कास परिसरात २ ते ३ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती ; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन; दुरुस्तीसाठी एक आठवड्याचा कालावधी लागणार

संबंधित बातम्या