सातारा : अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तिक विद्यमाने. विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन आयोजित .गौरव महाराष्ट्राचा सोहळा आनंदाचा 2025 अंतर्गत अध्यात्म पर्यावरण उद्योजकता व्यक्तिमत्व विकास लाइफ चेंजिंग एज्युकेशन इत्यादी विषयांमध्ये सर्वसमावेशक समाजाला आदर्श जीवन जगण्याचे महान सूत्र शास्त्र तंत्र व्याख्याना द्वारे जनमानसांना मार्गदर्शक करणारे, श्री संदीप तुकाराम दीक्षित. महाराज, मास्टर ट्रेनर. नागझरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील विश्वकर्मा फुड्स इंडिया अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोरेगाव जिल्हा सातारा चे संस्थापक अध्यक्ष यांना राज्यस्तरीय आदर्श मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
19 जानेवारी 2025 रोजी नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी समारंभपूर्वक संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये, प्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी साईबाबा हॉस्पिटल नाशिकचे प्रमुख यांच्या शुभहस्ते तसेच एम एल टी पॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन उद्योजक नारायण क्षीरसागर तसेच धुळे महाराष्ट्र येथील प्रसिद्ध व्यावसायिक पद्मश्री बिल्डरचे प्रमुख परागजी अहिरे, तसेच सचिन सोनवणे डेप्युटी जनरल मॅनेजर सीबी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सुमारे 500 स्त्री-पुरुष युवक युती उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी ,उद्योजक नारायण क्षीरसागर, व्यावसायिक पराग अहिरे, सचिनजी सोनवणे या मान्यवरांनी उपस्थितांना मानवी जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती करण्यासाठी संत व महापुरुषांनी, शास्त्रज्ञांनी मांडलेले आदर्श विचारांच्या मध्ये सत्यम शिवम सुंदरम या आदर्श मूल्यांचा स्वीकार करून आपलं जीवन जगावं अशा प्रकारचे मनोगते व्यक्त केले.
राज्यस्तरीय आदर्श मार्गदर्शक पुरस्कार विजेते संदीप दीक्षित महाराज यांनी आपल्या भाषणामध्ये विश्वप्रार्थना सादर करून मानवी जीवनामध्ये आदर्श कर्म करून कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास ज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येकाने केला पाहिजे. अज्ञान झटकून ज्ञान प्राप्त करणे, हाच प्रगतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. निर्व्यसनी राहणं, चारित्र्यसंपन्नता जपणं, विश्वामधल्या प्रत्येक जीवावरती निश्चित प्रेम करणं, देव देश आणि धर्मासाठी प्रत्येकाने आपले प्रामाणिक योगदान देऊन आपल्या भारत देशाला विश्व गुरु बनवण्याकरता भारत देशाला महासत्ता बनवण्याकरता खारीच्या वाट्याने आपण प्रत्येकाने योगदान द्यावं. अशा प्रकारचे मार्गदर्शन करून पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हार्दिक आभार मानले.