निमलष्करी माजी सैनिकांना घरपट्टी माफ करावी

माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 14 March 2025


सातारा : निमलष्करी दलातील माजी सैनिकांना घरपट्टी माफी करणे संदर्भात सातारा नगरपालिकेने ठराव पारित करावा, अशा आशयाचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिले आहे.

निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सन 2002 मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने सशस्त्र दलातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ व्हावी यासाठी पुढाकार घेऊन सातारा नगरपालिकेत ठराव पारित केला होता कालांतराने ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांची  घरपट्टी माफ केलेली आहे व त्याची पुरेपूर अंमलबजावणी मुख्याधिकारी या नात्याने अभिजीत बापट करत आहेत.

निमलष्करातील जवान सुद्धा आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान देत आहेत व देशाची सुरक्षा अबाधित ठेवत आहेत म्हणून त्यांना सुद्धा घरपट्टी माफ व्हावी त्यासाठी नगरपालिकेने ठराव पारित करावा जेणेकरून शासनाकडे पाठपुरावा करता येईल.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समाजभुषण - दलितमित्र स्व. शिवराम माने गुरूजी यांच्या अर्धपुतळ्याचे उद्या अनावरण
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या