सातारा : भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रवी सुलतान टोपे आणि भूषण सुलतान टोपे दोन्ही रा. तामजाई नगर, सातारा यांची भांडणे सुरू होती. ती भांडणे सोडवण्यासाठी संदीप बळवंत पवार रा. गडकर आळी, सातारा हे गेले असता संबंधित दोघांनी पवार यांना मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.