राहुल गांधींच्या निवास्थानाबाहेर साधूसंतांचा गोंधळ; घेराव घालण्याचा प्रयत्न, साधू-संतांसोबत काही महिला आंदोलकही होत्या

by Team Satara Today | published on : 07 August 2026


दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आज गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. काही साधू-संतानी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र  पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ आंदोलकांना तब्यात घेतले. आंदोलन करणाऱ्या साधू-संतांसोबत काही महिला आंदोलकही होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना राहुल गांधी यांच्या निवासस्थानाजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या परिसरात घडली. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या भागात आधीपासूनच कडेकोट निर्बंध लागू करण्यात आलेले होते. असं असतानाही एका गटाने अचानक येथे येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र  तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत  आंदोलनांना त्या ठिकाणाहून हटवले आणि ताब्यात घेतले.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलन करण्यासाठी आलेल्या साधू-संतांसोबत काही महिलाही होत्या. हा जमाव राहुल गांधींच्या निवासस्थानाजवळ जमला आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न  करू लागला. मात्र हा भाग कडेकोट  सुरक्षा व्यवस्था असलेल्या परिसरात मोडत असल्याने तिथे आधीपासून निर्बंध लागू होते. त्यामुळे पोलीस  कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना परिस्थिती चिघळण्यापूर्वीच आंदोलन स्थळावरून हटवले.

यादरम्यान, एका आंदोलनकर्त्या महिलेने संताप  व्यक्त करत सांगितले की, मी काँग्रेस पक्षाचा धिक्कार करते. आम्ही ५६ वर्षे पक्षासाठी आपलं रक्त आठवलं आता हे आम्हाला इथून बाहेर काढत आहेत. राहुल गांधी यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका या महिलेने केली.   


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेलया आसाराम बापूचा वैद्यकीय कारणावरूनही जामीन फेटाळला; तुरुंगातच २४ तास केअरटेकर ठेवण्यास परवानगी
पुढील बातमी
आमदार प्रवीण दरेकरांनी बावनकुळेंची पत्रे पाहावीत, उगाच डोके लावू नये; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

संबंधित बातम्या