सातारा : मंगळवार पेठेत जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळून आल्याने दोन गट आमनेसामने आले. या वेळी मारामारी, दगडफेक आणि शिवीगाळ झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गजानन नंदू आवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार क्षितीज उर्फ मुन्ना संतोष पवार, छोट्या पवार, संतोष पवार, विक्रम पवार, सोन्या पवार, साहिल आणि चकन्या दाद्या यांनी जमाव करून त्यांना दांडके व अन्य साहित्याने मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून परिसरात राहू न देण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक विपुल पाटील करीत आहेत. दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गजानन आवळे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. जुन्या वादातून आवळे यांनी घरावर दगडफेक केली. याबाबत जाब विचारला असता शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहायक फौजदार ढमाळ तपास करीत आहेत.
मंगळवार पेठेत दोन गट आमनेसामने; दगडफेक, दांडक्याने मारहाण आणि धमकी, परस्परविरोधी गुन्हे
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा