सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ या दोन संस्थांच्या वतीने रामदास स्वामींचा पुण्यतिथी अर्थात दासनवमी महोत्सव माग प्रतीपदेपासून मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक वातावरणात सुरू झाला. यानिमित्त दोन्ही संस्थांच्या वतीने पूजा, महाभिषेक, कीर्तन, प्रवचन, मंत्र जागर, गायन सेवा तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या दासबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण आधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहेत.
समर्थ रामदास स्वामींनी घालून दिलेल्या परंपरेनुसार या ठिकाणी होत असलेले सर्व कार्यक्रम व त्यासाठी संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देश आणि परदेशातूनही हजारो समर्थ भक्त या ठिकाणी आलेले आहेत. यानिमित्त मंदिरासह समाधी परिसर, विविध कार्यालय यांनाही विद्युत रोषणाईने झगमगाट करण्यात आला आहे.
समर्थ सेवा मंडळाने या दासनवमी काळातच आजवर ज्या ज्ञात, अज्ञात रामदासी तसेच विविध क्षेत्रातील भक्तमंडळींनी योगदान दिले त्यांच्या स्मरण प्रित्यर्थ लावलेला भव्य फलक विशेष लक्ष वेधणारा ठरत आहे.
सज्जनगड येथील समाधी मंदिरात केलेली श्री समर्थांच्या समाधीची विशेष पूजा, कर्नाटकातील तंजावर येथील अंध भक्ताने समर्थांच्या प्रेरणेमुळे बनविलेल्या राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती, समर्थांचे निवासस्थान अर्थात शेजघर, श्रीधर कुटीमंदिरात श्रीधर स्वामी यांची सुरू असलेली विशेष पाद्यपूजा,समर्थ सेवा मंडळाच्या श्रीराम भक्त निवासातील मनोहारी संगमरवरी श्री राम, लक्ष्मण मूर्ती. दररोज सायंकाळी सज्जनगडावर निघणारा वाजत गाजत छत्र, चामर, दंड आणि मानकर यांच्या समावेत हलगी-ताशाच्या निनादातील छबीना मिरवणूक तसेच पालखीत असलेली छोटी रामदास स्वामींची लोभसू आणि मूर्ती दास नवमी उत्सवानिमित्त श्रीराम भक्त निवास केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व त्याचे पाण्याच्या तलावात पडलेले प्रतिबिंब यासारखी मनोहर दृश्य दास नवमी काळात अखंड सुरू असलेले दासबोध ग्रंथाचे वाचन समाधी मंदिरात दररोज सायंकाळी रामदास स्वामी संस्थांच्या वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हटलेली मनाचे श्लोक रामरक्षा समर्थांच्या सवाया व इतर स्तोत्रे श्रीधर कुटीत मान्यवर ज्येष्ठ समर्थक आणि म्हटलेली कवणे व मनाचे श्लोक.