सातारा : अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हॉटेलमधून जेवल्यानंतर चौघे मित्र कारकडे पायी जात असताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक एकास धडकला. या अपघातात भगवान उत्तम कासकर (वय 42, रा. गोवा) हे जखमी झाले. त्यांना उपचारास नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाढा फाट्याकडे जाणार्या रस्त्यावर हॉटेल इंगळे पेढेवाले येथे दि. 19 रोजी रात्री 11.45 च्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी ट्रकचालक (आर जे 11 जी सी 8105) अलीजहान तिबु खान (वय 34, रा. खागाव, ता. फिरोजपूर, जि. नुहू, रा. हरियाणा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमलेश सुभाष कांबळे (वय 28, रा. सावंतवाडी, जि. सिंधूदुर्ग) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जैस्वाल तपास करत आहेत.