मणिपूर : भारताचा ईशान्येकडील भाद पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांनी धगधगत आहे. 15 नोव्हेंबरला मणिपूर आसाम राज्यांच्या सीमेवर असणाऱ्य जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मणिपूरमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. पुन्हा एकदा जाळपोळीच्या घटना घडू लागल्या. याचदरम्यान मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप व्यक्तींच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या हत्येचा शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ऐकून थरकाप उड़ेल. या क्रौर्यामध्ये निष्पाप मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही सुटले नाही.
गोळ्यांच्या खुणा, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि सर्वात वेदनादायक म्हणजे डोळे गायब..हे सर्व मिळून मानवतेला लाजवेल असे चित्र निर्माण करतात. ही केवळ हत्या नव्हती, तर मानवी मूल्यांना पूर्णपणे फाटा देणारा क्रूर अत्याचार करण्यात आला. मणिपूरमधील हे कुटुंब मेईतेई समुदायातील असल्याचे सांगण्यात येत असून कुकी अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये केलेल्या शवविच्छेदनानुसार, 10 महिन्यांच्या लैश्राम लमांगबा यांच्या शरीरावर चाव्याच्या जखमा होत्या, त्यांचे डोके कापले गेले होते आणि दोन्ही डोळे गायब होते.
णिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा भागातून संशयित कुकी अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केले होते. काही दिवसांनंतर त्यांचे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यातील जिरी नदीत आणि आसामच्या दलदलीच्या किनारी सापडले.
आठ वर्षांच्या तेलन थजंगनबीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोटात गंभीर दुखापत झाली होती. तेलम थोईबी (31) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यात कवटीच्या हाडांचाही समावेश आहे. महिला, बालक आणि अर्भक यांचा शवविच्छेदन अहवाल बुधवारी सार्वजनिक करण्यात आला, त्यापूर्वी कुटुंबातील इतर तीन सदस्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले होते.
ही घटना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराची आणखी एक खोल जखम आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमधील दीर्घकाळ चाललेला तणाव आता भयानक हिंसाचारात उद्रेक होत आहे ज्याने संपूर्ण राज्य व्यापले आहे. शेकडो लोक मारले गेले आहेत, हजारो बेघर झाले आहेत आणि संपूर्ण समाज भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत जगत आहे.
ही घटना केवळ मणिपूरचीच नाही तर संपूर्ण देशाची शोकांतिका आहे. धर्म, जात आणि प्रदेशाच्या नावावर होणारी हिंसा किती घातक असू शकते याची आठवण करून देते. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात अपहरण झालेल्या सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन महिला आणि एका मुलानंतर उर्वरित तिघांचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले आहेत. एका 10 महिन्यांच्या चिमुरडीला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने दहशतवाद्यांमधील क्रूरतेची पातळी लक्षात येते. जेव्हा अतिरेक्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मुलाचे दोन्ही डोळे काढले. सर्व मृतदेहांवर गोळ्यांच्या आणि क्रूर जखमांच्या खुणा आहेत. 17 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा भागातून संशयित कुकी अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केले होते. पुढील काही दिवसांत, त्यांचे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यातील जिरी नदी आणि आसाममधील कछार येथील बराक नदीत सापडले.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |