नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होतात.त्यापैकी काही कधी रिलीज होतात येतात हे अनेकदा ओटीटीप्रेमींना कळतही नाही.परंतू, काही चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांना कायम खिळवून ठेवतात. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशाच एका सीरिजची चर्चा होताना दिसते.गेल्या दोन महिन्यांपासूनच ही सीरिज टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे. या सीरिजचं नाव 'मंडला मर्डर्स' आहे.
नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्स निर्मित 'मंडला मर्डर्स' या वेब सीरिजमध्ये वाणी कपूर, सुरवीन चावला, श्रिया पिळगावकर आणि रघुवीर यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या बहुचर्चित वेब सीरिजमध्ये वाणी कपूर इन्वेस्टिंग ऑफिसरच्या भूमिकेत आहे. आठ एपिसोडच्या या सीरिजमध्ये प्रत्येक भाग अंदाजे ३० ते ३५ मिनिटांचा आहे.
अनपेक्षित वळणे,सस्पेन्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आहेत.या सीरिजमध्ये काळी जादू, गूढ खून, अंधश्रद्धा आणि पोलिस तपासाचा थरार यांचा सुरेख संगम पाहायला मिळतोय. सीरिजमधील प्रत्येक खून विचित्र आणि धक्कादायक पद्धतीने घडतो.
या वेब सीरीजची कथा चरणदासपूर येथे घडते. जिथे शहरात अचानक एकामागून एक खून होत असतात. 'मंडला मर्डर्स' ही सीरिज पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या खुनाचा तपास करण्यासाठी एक महिला सीआयडी अधिकारी राज्यात दाखल होते आणि तिथून सिरीजची खरी कथा सुरू होते. धर्म आणि विज्ञानावर आधारित 'मंडला मर्डर्स' या सिरीजमध्ये तो २५ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.आता ओटीटीवर या सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.